YE SAAJNA - Lyrics

Singer: Keval Walanj

ये साजणा ये
ये ना जरा
ये साजणा ये
ये ना जरा
श्वास पुन्हा का
बेभान झाला
अर्थ नवा हा जगण्यास आला
ये साजणा ये
ये ना जरा
ये साजणा ये
ये ना जरा

तुझ्याकडे पाहण्याचा छंद मला
छंद मला
मातीत या मिसळला कसा गंध तुझा
गंध तुझा
पावलेही आता धरती एक ठेका
जणू बोलती ही पैंजणे अशी का?
ये साजणा ये
ये ना जरा
ये साजणा ये
ये ना जरा

नजरेतूनी बोलण्याचा खेळ तुझा,
खेळ तुझा
भास होई सारखा हा दाही दिशा,
दाही दिशा
का पुन्हा छळतो वारा आज हा
स्पर्शूनी तू दूर जातो न बोलता...
ये साजणा ये
ये ना जरा
ये साजणा ये
परतूनी येना