Karu Nako Naad - Lyrics

Singer: A-JIT

करू नको नाद करू नको नाद
खोटं नको वाजू भावा चल रस्ता नाप
करू नको नाद करू नको नाद
वाढवला मराठी मी रॅप किती
जाऊन कर मोजमाप

Verse 1-
नावातच जित नाही माहिती हार
मिळवली जागा नाही आयती फार
जे फुकटचे चढलेत गाडीत चार
ह्यांना घेतो मी बाजूला चल पावती फाड
बाकी फेम चे भुकेले नाही ध्येय उरी
झळकुन ४ दिवस बसले घरी
नाही केलीस तू मेहनत जर का खरी
नाही देणार हरी हा तुला खाटल्यावरी
शब्द माझे टोचतात भाऊ
जीवनाचं केलं मी तर मोजमाप भाऊ
प्रत्येकाच्या आयुष्यात रोज ताप भाऊ
श्रोते बोलतात गाणी रोज टाक भाऊ
ओ शेठ
मी बोलतो थेट जर असेल ही शंका तर येऊन भेट
सरळ शब्दाने वार एका फटक्यात गार या रिंग चा किंग जणू खली द ग्रेट

Hook 2-
करू नको नाद करू नको नाद
खोटं नको वाजू भावा चल रस्ता नाप
करू नको नाद करू नको नाद
वाढवला मराठी मी रॅप किती
जाऊन कर मोजमाप

Verse 2-
भावकीत माहिती आपली किती लायकी
कोल्हापुरी ते adi nike
rap रुपी ही नवी गायकी
देतात दाद आज काका काकी
सत्यवचन ना फालतू बच्चन
जे आहे ते आहे ना राग रतन
तू बोलतोस मीच लई भारी
चल चल तुझ्यागत पाहिले छप्पन

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
वशिल्याच्या म्हशीचे आज मोठे झाले नाव
कामापुरता ह्यांनी केले भाव भाव
काम झाल्यावर ओळखत नाही तुम्हा राव
म्हणून भिडतो एकटा न पाठी बघता
ना पटला स्वभाव मी स्पष्टवक्ता
जो धरला रस्ता तो सोपा नव्हता
मी चाललो जितका तू दमला असता

कणा माझा ताठ घाटी माझी जात भाषेवर आहे मला माज
मराठी ही बोली मराठी हा श्वास मराठी आवाज
वेगळा हा थाट,वेगळी ही वाट,शाब्दिक शॉट
येऊदेत कितीपण अडचणी कधी नाही सोडणार कलेची ही साथ.

Hook 3-
करू नको नाद करू नको नाद
खोटं नको वाजू भावा चल रस्ता नाप
करू नको नाद करू नको नाद
वाढवला मराठी मी रॅप किती
जाऊन कर मोजमाप.