Morya - Lyrics

Singer: Saurabh Salunke

मोरया...

सकल जगाचा तूच विधाता
तूचि रे बुद्धिदाता
शरण तुला मी आलो अनंता
तूचि रे मायबापा... ||X2||

तुझ्या स्मरणी मिळे सुख जगाचे हो..
तुझ्या चरणी असे मी सदा रे..
नाम घोषात हरपून गेले रे भान देवा

बाप्पा हे मोरया.. मोरया
बाप्पा हे मोरया..
चरणी आलो तुझ्या हे मोरया..
बाप्पा हे मोरया… ||ध्रु||

मूषक स्वारी तुझी ही न्यारी
भक्त जनांसी तू अवतारी
दीन दयांचा तू कैवारी
साथ तुझी ही नौका तारी
वेडी माया तुझी ह्या जिव्हारी हो..
तुझ्या दरबारी विघ्न दुःख हारी
ओढ लागे तुझी लेकरांना तुझ्या रं देवा

बाप्पा हे मोरया.. मोरया
बाप्पा हे मोरया..
चरणी आलो तुझ्या हे मोरया..
बाप्पा हे मोरया.. ||१||

एकदंत तू वक्रतुंड तू
भालचंद्र तू गौरीपुत्र तू
विश्वेश्वर तू लंबोदर तू
सिद्धीविनायका...

विघ्न विनाशक विघ्नेश्वर तू
विघ्नराजेंद्र मोरेश्वर तू
पार्वतीनंदन धुम्रवर्ण तू
रिद्धी सिद्धी बुद्धी शक्ति दाता

अंकुरथ तू आलंपट तू
भुवनपती तू चतुर्भुज तू
एकाक्षर तू गजवक्तर तू
गणाध्यक्षाक्षिणा...

प्रथमेश्वर तू ओंकारेश्वर
मंगलमूर्ती रुद्रप्रिय तू
अवानिष तू एकद्रिष्ट
गजनानेती गणपती बाप्पा..
मोरया..

लंबोदरा रक्तवर्णा
शुर्पकर्णा गजानना
भक्तांवरी दयाकर्त्या
अच्युता जगकारणा ...