Ajun Kon Aahe - Lyrics

Singer: Kunal Ganjawala, Kasturi Wavre

अजून कोणी?

अजून कोणी आहे का रे बघू जरा
अजून कोणी आहे का रे?

अजून कोणी नाही ना रे इथे आता
अजून कोणी नाही ना रे

मनात आत आत खोल कोणी जाईना या इथे,
खोल खोल खोल जाईना रे

तुझ्याविना चुके, तुझ्याकडे झुके रे जीव हा,
तोल तोल तोल राहिना रे

का सारे उदास,
का जागा आता

का जागी उगाच,
चल भेटू पुन्हा

अजून कोणी नाही ना

रोज रोज येते नवे कुणी,
रोज रोज होते जुने कुणी.

रोज रोज येते जुने कुणी,
अन् रोज होते नवे कुणी.

मी चाललो लांब लांब आहे
मी थांबले बस तुझ्यात आहे.

जे पाहिजे ते आस पास आहे, ठाऊक आहे ना,
मन तरी ते का पाहिना रे ?

हळू हळू फुटू जी लागली, आता मनास ह्या,
ती पालवी नवी हीच ना रे?

का सारे उदास,
का जागी आता

का हसू उगाच,
चल भेटू पुन्हा

अजून कोणी नाही ना