Male: असाच असेल का?
Female: अशीच असेल का?
Male: भास होती मला, पाहिल्याचे,
स्वप्न दिसते मला, का उद्याचे,
Female: डोळ्यात आस अन हुरहुर ही,
वाटे आले अन् दूरदूर ही,
Male: गालावरचा रंग गुलाबी,
हसता हसता आज उडेल का?
Female: थरथरणाऱ्या हाती मेंदी,
बघता बघता आज सजेल का?
Female: असाच असेल का...
असाच असेल का तो असाच असेल का?
Male: अशीच असेल का...
अशीच असेल का ती अशीच असेल का ?
अंतरा १:
हसणाऱ्या या चेहऱ्यामागे,
धाकधूक वाढत जाय जाय जाय...
स्वप्नांच्या या रस्त्यावरती,
चक्कर मारून थकती पाय...
रात येते मन तसे
कोमेजून जाय जाय,
आस लावून वेडे पुन्हा
वाटेकडे पाहे पाहे
आपल्या वाटेवरती कोणी,
आपलीही मग वाट चुकेल का?
ग्रह तारे हे जुळण्याआधी,
या जन्माचा सूर जुळेल का?
Female: असाच असेल का...
असाच असेल का तो असाच असेल का?
Male: अशीच असेल का...
अशीच असेल का ती अशीच असेल का ?